‘धा’ या वर्णाने शेवट होणारा असा बोलसमूह जो जसाच्या तसा तीनवेळा वाजविल्यास त्या बोलसमूहातील शेवटचा ‘धा’ हा समेवर येतो त्यास ‘तिहाई’ असे म्हणतात.
तिहाईचे दोन प्रकार आहेत –
दमदार तिहाई : ज्या तिहाईत, तिहाईची बोलरचना तीनवेळा वाजविताना बोलरचनेतील पहिल्या दोन ‘धा’ वर दम म्हणजेच विश्रांती घेतली जाते त्या तिहाईस ‘दमदार तिहाई’ असे म्हणतात.
दमदार तिहाई – उदाहरण : ताल झपताल
तीटतीट घेघेतीट । धा —
तीटतीट । घेघेतीट धा । —
तीटतीट घेघेतीट ।। धिं
बेदम तिहाई : ज्या तिहाईत, तिहाईची बोलरचना तीनवेळा वाजविताना बोलरचनेतील पहिल्या दोन ‘धा’ वर दम म्हणजेच विश्रांती न घेता सलग वाजविण्यात येते त्यास ‘बेदम’ तिहाई असे म्हणतात.
बेदम तिहाई उदाहरण : ताल झपताल
धिंना धाती धाधा तींना । धा – धाती धागेना
धिंना धाती । धाधा तींना धा – । धाती धागेना
धिंना धाती धाधा तींना ।। धिं
खुप छान