स्वतंत्र तबलावादन सादर करताना पेशकार वाजविण्याच्या आधी तबलावादक एक जोरदार व भारदार तिहाईयुक्त रचना वाजवून समेवर येतो त्यास ‘उठान’ असे म्हणतात. त्याचबरोबर अभंग, भजन, नाट्यगीत, ठुमरी गीतप्रकारात, चंचल प्रकृतीच्या तालात म्हणजेच धुमाळी, दादरा, कहरवा तालात लग्गी सुरु करण्यापूर्वी वाजविल्या जाणाऱ्या आकर्षक बोलास उठान असे म्हणतात. बहुतकरून बनारस घराण्याचे वादन उठान वाजवून केले जाते.
उदाहरणार्थ : ताल त्रिताल
धातीट धातीट धागेतीट किडधेतीट धागे
दिं दिं नाना तीट घिनातीट घिनातूंना
क-तिरकीट धातीट धागे तीट कतीट ताsन
धा – कतीट ताsन धा – कतीट ताsन
धा – घेघे धागेतीट कतीट ताsन
धा – कतीट ताsन धा – कतीट ताsन
धा – घेघे धागेतीट कतीट ताsन
धा – कतीट ताsन धा – कतीट ताsन ।। धा