मुखडा किंवा मोहरा म्हणजे तोंड. संगीत कलेत समेवर येऊन मिळण्यासाठी वाजविला जाणारा सुंदर आकर्षक बोलसमूहांची रचना जी उत्स्फूर्तपणे वाजविली जाते त्यास मुखडा किंवा मोहरा म्हणतात. मुखडा किंवा मोहरा तिहाईशिवाय अथवा तिहाईसहीत असू शकतो.
काही विद्वानांच्या मते मुखडा आणि मोहरा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांच्या मते मोहरा हा मुखड्यापेक्षा लहान व कोमल बोलांचा समूह असतो तर मुखडा ही रचना मोहराच्या तुलनेत मोठी आणि जोरकस बोलांनी युक्त असते.
उदाहरणार्थ : ताल त्रिताल
धा धिं धिं धा । धा धिं धिं धा ।
धा तीं तीं ता । धिंना धा तिरकीट धिंना धाती धाती धाधा तींना ।