उर्दू भाषेमध्ये ‘कायदा’ म्हणजे नियम. विविक्षित (विशिष्ट) अक्षरांचा बोलसमूह ज्याची बांधणी तालाला अनुसरुन सम, खाली, टाळी अशा भागांमध्ये आवर्तित केलेली नियमबद्ध रचना म्हणजे ‘कायदा’. कायद्याची रचना तालाच्या एका किंवा दोन आवर्तनात पूर्ण होते. कायद्याच्या मुखातील बोलांचा आधार घेऊन त्याचे विविध पल्टे बनविले जातात आणि शेवटी कायदा तिहाईने संपविला जातो. ‘कायदा’ हा स्वतंत्र तबलावादनातील मुख्य प्रकार आहे. ‘कायदा’ विलंबित किंवा मध्यलयीत दुगून किंवा चौगुनीत वाजविला जातो.
उदाहरणार्थ : ताल झपताल
तीटधागे धिनागीना । धातीट धागेना धाग तिनाकीना ।
तीटताके तिनाकीना । धातीट धागेना धाग तिनाकीना ।