एकगुन किंवा बराबर : तालाच्या एका मात्रेच्या वेळेत एक अक्षर वाजविणे किंवा म्हणणे त्यास ‘एकगुन’ असे म्हणतात.
दुगून : तालाच्या एका मात्रेच्या वेळेत दोन अक्षरे वाजविणे किंवा म्हणणे त्यास ‘दुगून’ असे म्हणतात.
तिगून : तालाच्या एका मात्रेच्या वेळेत तीन अक्षरे वाजविणे किंवा म्हणणे त्यास ‘तिगून’ असे म्हणतात.
चौगून : तालाच्या एका मात्रेच्या वेळेत चार अक्षरे वाजविणे किंवा म्हणणे त्यास ‘चौगून’ असे म्हणतात.