तिहाईयुक्त बोलरचना तीनवेळा वाजविली असता त्या रचनेतील शेवटच्या तिहाईतील शेवटचा ‘धा’ हा समेवर येतो त्यास ‘चक्रदार’ असे म्हणतात. अशाप्रकारे ही रचना तीन चक्रात वाजविली जाते. चक्रदाराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चक्रात तिहाई असते व हे चक्र एक किंवा अनेक आवर्तनांचे असू शकते.
उदाहरण : ताल त्रिताल
कsतीट कsतीट
कत्रक धिकीट कत गदिंगन् धा –
कत्रक धिकीट कत गदिंगन् धा –
कत्रक धिकीट कत गदिंगन् धा –
कsतीट कsतीट
कत्रक धिकीट कत गदिंगन् धा –
कत्रक धिकीट कत गदिंगन् धा –
कत्रक धिकीट कत गदिंगन् धा –
कsतीट कsतीट
कत्रक धिकीट कत गदिंगन् धा –
कत्रक धिकीट कत गदिंगन् धा –
कत्रक धिकीट कत गदिंगन् || धा